STORYMIRROR

Rahul Shedge

Others

3  

Rahul Shedge

Others

देव माझा पंढरपुरी

देव माझा पंढरपुरी

1 min
170

देव माझा माझा पंढरपुरी 

दर्शन घेण्यास रांगा लागी ॥धृ॥


विठ्ठल-रखुमाई विटेवरी

हात जोडती लेकरं सारी 

चंद्रभागा ही झुळूझुळू वाही 

भक्तजन हो स्नान करी ॥१॥


देव असे सभोवताली 

सारे माऊली माऊली म्हणती 

संत एकनाथ भारूड गायी

माझा सावळा तोचि रे हरी ॥२॥


माय-बापांची चाले वारी 

नजर त्यांची असे आकाशी

हिरवीगार पिकं शेतीत उभी 

मनाला आस लागे पंढरीची ॥३॥


Rate this content
Log in