देश रक्षक जवान
देश रक्षक जवान
1 min
108
रक्षणासाठी जवान सिमेवरी उभा
मातृभुमीसाठी तोचि हो झिजला॥धृ॥
मायेच्या उदरात शुर हो जन्मला
धन्य धन्य हो झालीया माता
संघर्षातुनी जवान हा घडला
उरात त्यांच्या असे देशसेवा॥१॥
देशसेवेची त्यांच्या मनात भावना
जगाला शुरता दाखवुनी गेला
देशासाठी त्याने प्राण त्यागला
आपला जवान हा शहीद झाला॥२॥
बलाढ्य शत्रुशी तोचि लढला
जीवन अर्पण केले त्याने राष्ट्राला
कर्तव्याची जाण असे हो त्याला
माझा प्रणाम असे त्या शुरवीराला॥३॥
