दारूची नशा
दारूची नशा
जीव झुरणीला लागतो,काळीज पेटल्यावर...
तू गाढ निद्रेत,मी मोकळे करते अश्रू दाटल्यावर
तोल जातो तुझा,तू दारू पिऊन आल्यावर...
दचकुन उठती लेकरं,बाप झुलत आल्यावर....1
नशेत तुझी बडबड,होते माझी धडधड...
छळतोस किती वेळा,झोपेतच उठल्यावर...
दारूची नशा तुझी,बुडवील सारे घर...
चिमणीवानी लेकरं रं माझी,येतील रस्त्यावर...2
माणूस माणूस राहत नाही,नशेत गेल्यावर...
बायको-लेकरं कचर्यासमान,दारूचा घोट घेतल्यावर....
तळमळतो जीव आईचा,घर आतून पेटल्यावर.
करेल सामना लाख संकटाचा,दादला चांगला असल्यावर....3
काय कामी शरीर बेवड्याचं,नशेच्या खाईत लोटल्यावर...
तंबाखू,गुटखा,पुडी खिळखिळी हाडं सरणात गेल्यावर...
होत्याचं नव्हतं होईल,जीव झुरणीला लागल्यावर...
सोबती सरणाचा तू,दाराच्या नशेत पेटल्यावर...4
