STORYMIRROR

Vijay Sanap

Others

3  

Vijay Sanap

Others

दादा

दादा

1 min
322

दादा,तुमच्या जाण्यानं

आम्ही  पोरके झालो

हरवलं  मायेचं  छत्र

आम्ही  पारखे  झालो ।।

बालवयात तुम्हीच

दिले आम्हा संस्कार

तुमच्यामुळेच आमचे

उभे सुखाचे संसार ।।

तुम्हीच शिकविले दादा

नित संस्काराचे  पाठ

तुमच्याच आर्शिवादाने

झाली सुकर आज वाट ।।

दुसऱ्याच्या  सुखात

तुमचा आनंद मोठा

नाही केली कधी पर्वा

काय होईल यात तोटा ।।

दादा, तुमच्याच कृपेने 

परिवार सुखी  झाला

आज तुमच्या वाचून

हा महाल सुना झाला ।।

कधीच वाटलं नव्हतं 

असं काही तरी होईल

माथ्यावरचा सुर्य असा

अचानक अस्थाला जाईल ।।



साहित्याला गुण द्या
लॉग इन