चंद्रग्रहण
चंद्रग्रहण
1 min
174
आकाशी हा खेळ खेळते छाया
चंद्रावर ही पृथ्वी पाडे छाया
लोभसवाणे मुखडे पाडे काळे
सौंदर्याला ग्रहण लावते छाया
पृथ्वीवरच्या चंद्र प्रेमास गाडे
वसुंधरेचा नकार आहे छाया
अखंड पूजा प्रदक्षिणा तुज पृथ्वी
झिजवून युगे शेवटी मिळे छाया
तुझ्या प्रेमात चंद्रा कळले पृथ्वी
भास सगळे सत्य एकटे छाया
