STORYMIRROR

Sudhir Marathe

Others

3  

Sudhir Marathe

Others

चल जाऊ या खेड्याकडे

चल जाऊ या खेड्याकडे

1 min
272

माझ्या गोवळ गावाच्या माथ्यावर काळ्या कातळाचा सडा,

सह्याद्रीच्या डोंगर रांगानी केली सभोवती कड़ा ।।


वाहते नदी अर्जुना पायथ्याशी, नाचते भरती ओहोटीच्या तालावर,

पावसात ती तुडूंब भरते, मातीचा रंग गढूळ घेऊन पळते।।


शेतात येतो मास्यांचा पुर, येती खेकड़ेही खड़कातुन बाहेर,

ताव मारूनी गावकरी घेती, भुरकती मासळी खेकडयाचा रस्सा।।


माध्यमिक शाळाही नदीपल्याड जाती विद्यार्थी जीव मुठीत,

पण जिगरबाज नाविक पुरातही डोलविती नौका।।


काठावार नदीच्या हिरवीगार शेते,

तांदूळ, कुळीद,भाज्या वांगी,वाल,मिरची चवदार।।


लग्न सराई म्हणजे गाव मेजवानी,

बसती गावकरीे पंगतीत, चाटतात बोटे ,वांगी, फणसाची जनता भाजी।।


शेतातून टिव टिव टिट्विचा आवाज घुमतो ,

खंडया पक्षी उक्तिच्या टोकावर बसूनी शांतपणे पाहतो।।


प्रत्येकाच्या शेतात एक शेणाचे खळे,

बाव पाण्यानी भरल्या पाटाला वाहे ठंड पाणी ,प्यायला मिळते।।


गवत मळणीचा बेत शेतात गाव जमते,

रातभर कष्टकरुन मटनाच्या जेवनात रमते।।


घराघरात कुळदाच्या पिटीचा सुवास,

न्याहरित चटनी भाकरी पेजेचा आहार।।


गोठयात घराच्या गाय बैलांच्या जोड्या ,

गुरे चरायला हिरवा शेतात चारा।।


चिंचेच्या झाडावर बसून राखति गुरे,

रेड्याच्या पाठीवर बसून मारती फेरफटका मुले।।


अनुदानाविना प्राथमिक शाळा मधल्यावाडीत चालते,

स्वतंत्रयपुर्विचा इतिहास शंभरी झाली आता पार ।।


मान्यवरानी इथल्या केला भविष्याचा विचार,

स्वकष्टाने बांधली नवीन ग्रामपंचायत।।


आता बांधली लोकांनी चीरेबंदी वाडे,

पण रहिलेत इथे लोक थोडे थोड़े।।


घरे आता शिमग्या गणपतीला भरती,

सण साजरे कराया गाव ,मुंबईकर गाठती।।


नमन, दशावतार, भजन, फुगड़ी खेळ,

नवीन त्यात आता गरबा दाण्डयाचाही मेळ।।


रामेश्वर देवळात आहे एक बाव आणि तलाव स्थापत्य शास्त्राचा अविष्कार,

त्याची नाळ जोडली सड्यावरचे पाराला।।


आठवणीत गावाच्या अजूनही मन रमते,

विनंती माझी देवा जप निसर्गाचे देणे ,माझ्या खेडे गावा।।


Rate this content
Log in