चिवचिव चिमणी
चिवचिव चिमणी
1 min
243
चिव चिव चिमणी करते चिवचिवाट
येते नाचत अंगणी होता रोज पहाट
नाचतच चालतेस उचलते दाणे पटकन
घेते स्वतःभोवती गिरकी उडून जाते झटकन
दाणे घेऊन जाते घरटी पिल्लांना खाऊ घालण्या
घेते काळजी पिलाची शिकवते तया उडण्या
रूप तुझे पिटूकले परि आहे ते मोहक
नाच तुझा विलक्षण नेहमी चित्त वेधक
