STORYMIRROR

Poonam Jadhav

Others

3  

Poonam Jadhav

Others

चिऊताई

चिऊताई

1 min
181

छोटीशी चिऊताई

दूर दूर जाई

इवले इवले पंख तरी

उंच उंच भरारी घेई


नाजूक तिचे छोटे पाय

अंगणात खेळायचे,

बघुन तिची टुनुक उडी

बाळ राजे हसायचे


इवल्या इवल्या डोळ्यांनी

इकडे-तिकडे बघायची,

नाही कुणी जवळ बघुन

हळुच दाणे टिपायची


रेखीव तिची चोच

काड्या-कुड्या गोळा करायची,

नाहीत हात तरीही 

सुंदर घरटे विणायची


झाडांच्या फांदीवर रोज

रंगांयचा चिमण्यांचा लपंडाव,

किलबिल त्यांच्या आवाजाने

सुखावायचा सारा गाव


चित्रांतच उरल्या आता

चिऊताईच्या गमती सार्या,

सिमेंटची जंगले मोठी मोठी

पण नाही कुठे चिऊताई ला निवारा      


साहित्याला गुण द्या
लॉग इन