चित्र बनविले...
चित्र बनविले...
1 min
494
सुंदर रंग प्रेमाचे घेऊन
तुला माझ्या समोर बसवून
तूझं रूप मी मनांत बसविले....
तुला गं मी रंगात घडविले
बघ राणी मी तूझं चित्र बनविले...
रंगात मिसळले तुझे रंग
पाहून तुझे भाव क्षण दंग
तुझे नखरे मी चित्रातं चमकविले....
तुझ्यातं विसरून सारं भान
प्रेमाच्या रंगात झालो बेभान
तुझे सारे मी वाईट गुण हटविले.....
जगावेगळ तूझं सावळ रूप
संगमला वाटे तुझ्वीन जग कुरूप
सगळ्यांना सोडून मी तुला पटविले....
