STORYMIRROR

Shila Ambhure

Children Stories

1  

Shila Ambhure

Children Stories

चिंब चिंब पाऊस

चिंब चिंब पाऊस

1 min
382


टपटप पाऊस

थेंबही गारगार.


भिजताना वाटे

मजा फार फार.


पावसाची बघा

सतत धार धार.


चिंब चिंब झाली

झाडे हिरवीगार.


चल चल गड्या

उघडून ये दार.


पावसात मारू

उड्या चार चार.


बसू दे पाठीशी

आईचा मार मार.


खुप खुप भिजू

मानू ना हार हार.



साहित्याला गुण द्या
लॉग इन