छंद
छंद
1 min
9
वेड लागले जणू मज
लेखनी अन् शब्दाचे
रचते रोज मी पान नवे कवितेचे
विचारांना ही वाट माझ्या
कागदावरती गवसते
मनातली भावना माझी
साधेपणाने प्रगटते
प्रतिक्रिया आणि प्रतिसादातून
नवी उमेद मज मिळते
वाचक माझे म्हणतात तुमचे
लेखन मनाला थेट जावून भिडते
माता सरस्वतीच्या सेवेची संधी
जणू माझ भाग्य समजते
प्रसिद्धीची हाव नाही मजला
मी तर केवळ माझा छंद जोपासते ...