चौकट
चौकट
आलीस.? ये
स्वागत आहे
तेव्हढं माप ओलांडून ये
आहा..असं नाही.!
जरा नजाकतीने घे
आणि हो
येण्याआधी
ती चौकट पाहून घे..!!
अशी बावरू नको
ती त्याची सावली आहे
तू तुझी पाहून घे
अंमळ मोठी आहे
आधी तीच सून होती
आता सासू आहे
तिच्या कलेकलेने घे
ती ठेवू पाहिलं तुला मुठीत
सुन-बाई म्हणत
अन् तुलाही ऐकावं लागेल तिचे
अन्यथा राहशील तू कण्हत..!!
आणि ती पहा
त्याच्या सावलीची छोटी सावली
आता त्याचा बाजूला आहे
पण नंतर अभावाने दिसेल
तरीही
तुझ्या सावलीची ही छोटी सावली
जरा नीट पाहून घे
ह्या घरात तिचाच प्रभाव असेल
कारण हे घर तिचेच अंगण आहे
ते नणंद नावाचं रिंगण आहे
आणि तिच्याच मर्जीने तुला
त्याच्याभोवती फिरायचे आहे..!!
घाबरलीस..?
साहजिक आहे
आणि असंही वाटत असेल ना..?
की ही सावल्यांची चौकट उखडून टाकावी.?
पण जमणार नाही
माप ओलांडण्या इतके ते सोपे नाही
अगं सावल्याचं काय..?
त्या आज ना उद्या विरळ होतील
पण एके दिवशी
तूच मोठी सावली होशील
तेव्हा मात्र हीच चौकट तू कुरवाळत बसशील
येणाऱ्या नवसावलीला मुठीत ठेवण्यासाठी..!!
