Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prof. Dr.Sadhana Nikam

Others

3.2  

Prof. Dr.Sadhana Nikam

Others

चांदोमामा

चांदोमामा

1 min
14.4K


आभाळातून चांदोमामा

आज असा डोकावतो

लपाछ्पीचा खेळ तो

चांदण्यांशी खेळतो


आभाळातून चांदोमामा

ढगाआड लपतो

पाठशिवणीचा खेळ तो

ढगांशीच खेळतो


आभाळातून चांदोमामा

पौर्णिमेलाच खुलतो

अमावस्येला मात्र तो

गडपच होतो


आभाळातून चांदोमामा

चांदणे हे शिंपतो

धवल अशा दुधात

अमृतच कालवतो


आभाळातून चांदोमामा

गोलाकार फिरतो

तेजोमय प्रकाशाने

सृष्टीलाच व्यापतो


आभाळातून चांदोमामा

आज असा खुणावतो

भातुकलीचा खेळ तो

आमच्याशी खेळतो.


Rate this content
Log in