चांदणी
चांदणी
1 min
8.4K
चंद्राच्या साक्षीला
चांदणीची साथ होती
चांदणी नभात खेळ
भातुकलीचा मांडत होती.
चांदणी चांदण्या सोबत
खेळात रमत होती
चंद्र दिसताच चांदणी
गालात लाजत होती.
लपतछपत हळूच
चंद्राला न्याहाळत होती
स्वप्न संसाराचे
चंद्रा समवेत सजवत होती.
अमावस्येच्या काळोखाला
नुसतीच ती घाबरत होती
पौर्णिमेच्या प्रकाशाला
चंद्रासोबत न्हात होती.
चंद्रासोबत चांदणी गीत
प्रीतीचे गुणगुणत होती
चंद्राच्या साक्षीला
चांदणीची साथ होती.