STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

4  

Meenakshi Kilawat

Others

चाहूल दिवाळीची

चाहूल दिवाळीची

1 min
168

चाहूल दिवाळीची लागूनी

तनामनात उल्हासाच्या राशी

शोभिवंत पणत्यांचा लखलखाट

चहूकडे आल्हाद देतोय मनस्पर्शी।।


आनंदाचा दीपोत्सव हा      

कर्तृत्वाच्या झळकतोय आकाशी

प्रभावळ करूनी दीपावळीची

सुख समाधान तारतोय जीवनाशी।।


उल्हासाच्या अंगणी दीपावळीला

कोणा कृतार्थ करूनी आरास मांडावी

असतो मुहूर्त धनत्रयोदशीचा तेव्हा

गरजूंच्या हृदयात दिवाळी दरवळावी ।।


दिसती लक्ष्मी घरी कशा नटूनथटून

उमटवती पाऊलखुणा नाचून हसून

वातावरण शुद्ध ठेवणे परिसर स्वच्छ

आल्हादपूर्ण चैतन्यदायी आभास पेरूनी।।


सुंदर रांगोळ्या दारोदारी

आकाशदिव्याची रंगत असते न्यारी

जणू येतसे आकाशातील भेटीसाठी

चंद्र चांदणे पृथ्वीतलावरी।।


पंचपक्वान्नाचा सुग्रास सुगंध

घरीदारी मायेचा दरवळ फैलावा

सौजन्याचा नामानिराळा फराळ

अनाथ लेकरांच्यापण मुखी घालावा।।


रक्षण करावया वृक्ष पर्यावरणाचे

फटाक्यांवर आळा घालावा

वाचवुनी प्रदूषणाची विल्हेवाट

दीपप्रज्वलनाने सार्थ करावा।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन