बोलणे तुझ्याशी
बोलणे तुझ्याशी


कसं बोलायचं
सांग सख्ये...
शरीरातलं पोटात
येत नाही...
पोटातलं तोंडात
येत नाही....
तोंडातलं जिभेत
येत नाही....
जिभेतलं ओठांवर
येत नाही....
या सगळ्यांत तुझं
नाव घेतल्याशिवाय
मला श्वास सोडता
येत नाही....
सांग सख्ये तुझ्याशी
प्रेमाने बोलावं तर कसे?