जगण्यातल अस्तित्व
जगण्यातल अस्तित्व

1 min

640
एक थेंब पाणी
तुझ्या चोचीत पडले
काय हे चिऊताई
तुला ते अमृतच भासले...||1||
जगापासून वेगळी झालीस
जगच तुझ आधार होत
चिऊताई अशी का गं रूसलीस
खूप काही बोलायच बाकी होत...||2||
थेंब तो पाण्याचा
घेवून जातेस पिलांसाठी
रोजच हा त्याग
करतेस ना गं त्यांच्यासाठी...||3||
वणवण करून तू
कधीच ना थकणार
पाण्याविना सांग ना
तुझी तहान कशी शमणार...||4||
सांग चिऊताई आता माणसांना
पाण्याच गं महत्व
पटवून दे चिऊताई
तुझ्या जगण्यातल अस्तित्व....||5||