STORYMIRROR

Prachi Deshpande

Others

4  

Prachi Deshpande

Others

बकुळीसारखं असावं

बकुळीसारखं असावं

1 min
307

या छोट्याशा बकुळीसारखच असावं,

थोडंसं मोठं होवून बहरलं की झाडापासून स्वतंत्र व्हावं ..


काळ्या पाषाणावर जसं त्याने उठून दिसावं ,

तसंच, कितीही काळोख झाला तरी आपलं चरित्र शुभ्र राहावं ..


जमिनिवर गळून पडलं असतं , छोटसं असूनही कुणी दखल घ्यावयाची अपेक्षा ठेवत नसतं , तरिही नजर खेचून घेत असतं ;

अगदी तसंच जमिनीवर निरपेक्ष राहून आपल्याला कुणाच्याही नजरेत भरता येत असतं ..


ओंजळीत घेऊन त्याचा मंद सुगंध दरवळतो

आणि पायाखाली येउनही , कोमलतेचाच स्पर्ष जाणवतो..


म्हणून कायम दरवळावं,

कुणी कुरघोड़ी केल्यास त्यास कोमलतेनेच सहज हारवावं ..


एखाद्याच्याच नजरेत येऊन त्याच्या ओंजळित पडावं,

आणि आयुष्यभर ध्यानात राहील असा सुगंध मागे सोडून जावं!!



Rate this content
Log in