बीजांकूर
बीजांकूर
1 min
630
बीज अंकूरूनी येती,
येती मातीतून हळूच वरती.
येती कशी? माळरानातील झाडे.
कशी ऐटीत उभे ही होऊनी खोडे.
बीजांकूर शिकविती,
जे पेरले तेच येती.
ह्याची ठेवली ज्याने जाण,
त्याच्याच पुढे सारे हे नमती.
निळ्या आकाशाखाली,
ना निगराणी, ना मायेची पाखर.
माळरानी उभी ही खडकात,
ना कोणी वाली, ना कष्टाचा पाझर.
उन्ह,पावसाळा झेलत,
ताट मानेने वाऱ्यासंगे खेळत.
थकला भागला जीव,
क्षणभर विसावतो सावलीत.
नाही त्यास मान अभिमान,
देत जाणे हाच स्वभाव.
का? उठला त्याच्याच जीवावर,
किती क्रुर झाला हा मानव.
मज भासतात ते कल्पतरू,
जणू साधू संतांचे अवतारी.
एकांतात लांब बसून,
करतात ध्यान साधना ही खरी
