भय...
भय...
1 min
292
नवीन नवीन करतोस नखरे
स्वप्नांत उडवितोस प्रेमाची पाखरे
हा वेडा जीव तुझ्या नावावर केला
तू तूझं प्रेम रे माझ्या नावावर कर....
मी मरते तुझ्यावर तू माझ्यावर मर
वाटे रे मला भय तू माझा हात धर.....
मला धन दौलत नको ना दागिने
तू प्रेम माझं सांगितलं मला जोगीने
पाहिलं रे आई बाबांनी माझ्यासाठी वर....
तूझं गोड गोड स्वप्नं रोज मी पाहते
स्वप्नांत तुझ्या मी माझीच ना राहते
हे शरीर तूझं मी जगते तुझ्या श्वासावर....
उपकार कर घेऊन चल पाईप लाईनला
संगम विसरले ना तुझ्या प्रेमाच्या साईनला
खुप प्रेम करीन रे मी जन्मभर तुझ्यावर.....
