भरलेले गोकुळ
भरलेले गोकुळ
नाही मला सून,
नाही मला मुलगी
सांगा पाहू कोणाशी
दाखवु मी सलगी
जेव्हा माझ्या घरी येतील
दोन दोन सूना
एक कोपरा देखील
राहणार नाही
आनंदाविण सुना
सूनेला मानेन मुलगी
करीन तिचे लाड
तिने पण माझ्या घरात
लावावे आनंदाचे झाड
घर म्हंटले की कधीतरी
भांड्यांला भांडे लागणार
कधी हळू कधी जोरात
वादविवाद होणार
भांडणानंतर वाढते प्रेम
गोडी वाढते हळूहळू
कधी मी सासू कजाग तर
कधी होईन आई मायाळू
कधी मी रागावले तर तिने
रूसवा नाही धरावा
आई देखील अशीच
ओरडली असती
असा विचार करावा
मग माझे घर हळूहळू
तिचे देखील होईल
भरलेले गोकुळ मग मी
समाधानाने पाहीन