भन्न ऊन्हं
भन्न ऊन्हं
1 min
212
भन्न दशदिशांच्या उन्हात दुपारी
चिमण्यांचा थकला चिवचिवाट
पांघरूण माया झाड सावल्यांची
अर्धजागी आळसावते वाट ।।
उन्हाचे चालूच होरपाळणे
सावल्यात सुस्त कुत्रे, रवंथणारी गाय
सावकाश सरपटणाऱ्या सावल्यात
कुणी भिजवितात करपले पाय ।।
कुठे कॅप अन् स्टायलिश गॉगल
कुठे घामेजलेला देह ओढे चप्पल तुटलेली
गावा काठचे उदास आटलेले तळे
तळ्यात कमळं निपचित हिरमुसलेली
ऋतू सारेच करपीत राहिली ऊन्हं
सुकल्या ओठी विरली गाणी भन्न ऊन्हं।।
