भक्तीचा गांव पंढरपुरी
भक्तीचा गांव पंढरपुरी
1 min
192
भक्तीच्या वाटेवर गांव तुझा देवा
भेटायाशी आलो मी तुझ्या व्दारा ॥धृ॥
ज्ञानोबा,तुकाराम,एकनाथ संत
वारकरी चाले पंढरीची वाट
टाळ,मृदुंगाचा करोनी गजर
हरीचा करू हो जय जयकार ॥१॥
सार्या जगाचा तुच रे दाता
तुला पाहोनी आनंद होई मला
मी तुझा भक्त साधा-भोळा
तुझीच असावी माझ्यावरी कृपा ॥२॥
र्निगुणी,निराकार असे तु देवा
युगे युगे तुचि विटेवरी उभा
चरण वंदीतो तुझे राया
तुझीच सदा घडावी सेवा ॥३॥
साधु-संताचा जमलाय मेळा
सुख-समाधानी जग राहो सारा
मनोमनी इच्छा पुर्ण व्हावी देवा
हरीजणांचा देव तुच रे पाडुरंगा॥४॥