STORYMIRROR

Kalpana Nimbokar

Others

4  

Kalpana Nimbokar

Others

भिती कशाला

भिती कशाला

1 min
415

भिती कशाला 


आकाश हवे मज माझ्यासाठी

लालसा असे स्वप्नाची

उभी ठाकले आज रणी मी

भिती कशाला लढण्याची !!!!!


इच्छा तिथे मार्ग मिळे

का घ्यावी परिक्षा रस्त्यांची

संकटाला ठणकावून सांगेन

भिती कशाला लढण्याची !!!!


कधी होता स्वर कातर

जिदद् हवी भिडण्याची

नजर रोखून पाहील जिवना

भिती कशाला लढण्याची !!!!


नकोच वेध चंद्राचे अन

आशा खूळया तारकांची

नभांगण हे घेईल जिंकुन

भिति कशाला लढण्याची !!!


पेलुन घेईन आव्हानांना

नियत भरारी घेण्याची

गहिवरल्या शब्दाना सांगते

भिती कशाला लढण्याची !!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन