STORYMIRROR

Shubham Yerunkar

Others

3  

Shubham Yerunkar

Others

बहिणीची माया...

बहिणीची माया...

1 min
34

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर

   असेल हातात हात....


अगदी प्रलयाच्या प्रत्येक वाटेवरही,

   असेल माझी तुला साथ....


 माझ्या जिवनाचा हरेक क्षण,

तुझ्या रक्षणार्थ सरलेला असेल...


 राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत,

विश्वासच सदैव उरलेला असेल....


नात हे प्रेमाच नितळ अन् निखळ,

    मी सदैव जपलयं.....


हरवलेले ते गोड दिवस, त्यांच्या मधुर आठवणी,

     आज सारं सारं आठवलयं.....


   हातातल्या राखीसोबतच,

बहीण तुझ प्रेम मनी मी साठवलयं....


बंध हा प्रेमाचा,नाव जयाचे राखी,

बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती....


  औक्षिते प्रेमाने, उजळुनी दीपज्योती,

रक्षावे मन सदैव,अन अशीच फुलावी प्रिती.....


बंधन असूनही, बंधन हे थोडेच,

 या तर हळव्या रेशीमगाठी....


Rate this content
Log in