भेट तुझी अन् माझी
भेट तुझी अन् माझी
का चुकल्या वाटा अन् का घडल्या भेटी
का जपले दरवळलेले हे गीत तुझ्यासाठी
सप्त सुर गवसले तुझ्या या मैत्रीपरी
मारू का एक दिवस आपणहि भरारी
शब्दांविना डोळ्यांनी वाचली हि कहाणी
मजवर भुरळ घाली तुझी सुंदर हि मोहिणी
अपुरीच पडते वर्णन्या शब्दगंधाची हि लेखणी
नाजूक नात्यातील जपत राहूया आठवणी
चुकल्या असतील आपुल्या पाऊलखुणा
विश्वास न कमी व्हावा आपुल्या सवंगड्याना
पुढच्या जन्मी तरी पुरे व्हावे हे अधुरे गाणे
मीच असेन तेव्हाही आणि तूच असशील दिवाणे
