भाव माझ्या मनातले
भाव माझ्या मनातले
1 min
229
भाव माझ्या मनातले
तुम्ही ओळखाल का?
स्त्री म्हणून नेहमी पाहता
माणूस म्हणून पाहाल का?
समाजात या आम्हालाही
समतेची वागणूक द्याल का?
नकोत आम्हा मान सन्मान
नको आम्हास दुर्गेचे स्थान
तुमच्यासारख्याच माणूस म्हणून
द्याल का या जगात स्थान
अॅसिड हल्ला, हुंडा बळी,
रस्त्यावर किती जणींचा
जाणार आहे अजूनी बळी?
समतेसाठी आक्रोंदणारे
भाव स्त्रीच्या मनीचे
हे समाजा कधी तुला
कळणार का?
समानतेच्या भावनेने स्त्रीयांकडे
पाहाल का?
