STORYMIRROR

Manisha Joshi

Others

4  

Manisha Joshi

Others

भाव माझ्या मनातले

भाव माझ्या मनातले

1 min
430

भाव माझ्या मनातले

तुम्ही ओळखाल का?


स्त्री म्हणून नेहमी पाहता 

माणूस म्हणून पाहाल का?


समाजात या आम्हालाही 

समतेची वागणूक द्याल का? 


नकोत आम्हा मान सन्मान 

नको आम्हास दुर्गेचे स्थान


तुमच्या सारख्याच माणूस म्हणून 

द्याल का या जगात स्थान 


अॅसिड हल्ला, हुंडा बळी,

रस्त्यावर किती जणींचा 

जाणार आहे अजूनी बळी?


समतेसाठी आक्रोंदणारे

भाव स्त्रीच्या मनीचे


हे समाजा तुला कधी 

कळणार का? 

समानतेच्या भावनेने स्त्रियांकडे

पाहाल का?


Rate this content
Log in