STORYMIRROR

काव्य चकोर

Others

4  

काव्य चकोर

Others

भाऊबीज

भाऊबीज

1 min
465

तेव्हा दोघे लहान आणि निर्मोही होते

ती कमावत नव्हती

तोही कमावत नव्हता

पण तरीही प्रेम रग्गड होतं

म्हणूनच बापाकडे हट्ट असायचा

बापही तो खुशीने पुरवत होता

आणि भाऊबीजेचा सण

दोघांच्या प्रेमाची पर्वणी ठरत होता..!!


आता मात्र ती कमावते

पण तिचा हिशोब नवऱ्याकडे आहे

कारण तिचं लग्न झालंय

आणि तोही कमावतो

पण त्याचा हिशोब बायकोकडे आहे

कारण त्याचंही लग्न झालंय

कदाचित त्यामळेच प्रेम व्यवहारी झालंय

आणि भाऊबीज?

ती मात्र वाट पाहतेय

प्रेमाचं कवाड खऱ्या अर्थाने उघडण्यास

कोण उत्सुक आहे..!!


|| भाऊबीजेच्या निर्मोही हार्दिक शुभेच्छा ||


Rate this content
Log in