STORYMIRROR

प्रविण कावणकर

Others

3  

प्रविण कावणकर

Others

भाऊ बहिणीच नात

भाऊ बहिणीच नात

1 min
234

रक्षाबंधन म्हणजे बहीण

भावाच अतूट आहे बंधन

आपुलकीच्या नात्याला 

दुरावा कुठला नसावा वंदन


बहीण आपल्या भावाला

रक्षासुत्र त्याला राखीबांधते

प्रगती सुखी आयुष्यासाठी 

बहीण भावाला वचन त्याला देते


बहीण भावाला बांधते राखी

संगोपन करून करते स्वीकार

ओवाळून आरती भाऊला

असावा बहिणीचा नमस्कार


ध्येयाच्या दिशेने आठवण 

करून बहिणीची राखी देते. 

राखी बांधताना त्याला बहिण 

भावाचे पुढच्या जन्मी रक्षण करते.


प्रेम भावना विश्वास आपुलकी

नात्याला चांगली जोड असावी

कुठल्याही प्रसंगी एकमेकांत 

गुंतून टिकणारी नाती रहावी.


हा रेशीम धागा आयुष्याचा

तुझी आठवण करून देईल 

भाऊ बहिणीच जीवनाचं नात

नव्या स्मरणात टिकून राहील


Rate this content
Log in