भारताचे संविधान...
भारताचे संविधान...
1 min
926
*भारताचे संविधान...*
भारताचे संविधान
ठरले जगात महान ।धृ।
येथे अनेक आहेत जाती
येथे अनेक आहेत धर्म
हे राष्ट्र धर्मनिरपेक्ष
त्याचा ना कोणताच धर्म
येथे स्त्री-पुरुष
सारे एक समान ।1।
भारताचे संविधान...
संविधानात अंतर्भुत
न्याय आणि समता
सर्वांना दिले स्वातंत्र्य
जपतो आम्ही बंधुता
येथे कुणीच नाही
मोठा आणि लहान ।2।
भारताचे संविधान...
संविधानाने देशात
आली हो लोकशाही
येथे संविधानापुढे
नाही चालणार हुकुमशाही
येथे लोकच झाले राजा
येथे लोकांचेच शासन ।3।
भारताचे संविधान...
