बेजार
बेजार
1 min
273
तू
लाजतेस निरागस
हसतेस लोभस
अन्
करतेस हदयाचे
तुकडे हजार ।।
तुझ्या
गालावरची खळी
ओठाची गुलाबी पाकळी
अन्
कित्येक जणांचे
हाल बेजार ।।
तुझी
कमनीय चाल
भिरभिरणारे बाल
अन्
मजला झालायं
प्रेमाचा आजार ।।
तुझ्या
नयनाचे कोंदण
पापण्याचे तोरण
अन्
जीवन माझे
तुजला साभार ।।
