बेगडी
बेगडी
1 min
850
बेगडी
कुणावर करू भरवसा
हे जग सारे बेगडी
नाही देत हे आधार
उलट खेचती तंगडी.
कामापुरते बोली गोड
मात्र कडू यांची जिभ
मागे धावती खोट्यांच्या
यांना सुटलाय लोभ.
साध्याभोळ्यांना हेरून
तयांनाच हे लुटती
वरचढांना पाहूनी
पहा धूम हे ठोकती.
सारे खोटेच वागती
आई बापाला ना भित
बेगडी हे सारे जग
झाले स्वार्थाने लथपत.
