STORYMIRROR

भास्कर आग्रे

Others

3  

भास्कर आग्रे

Others

🙏बाप्पा नको तिसरी लाट🙏

🙏बाप्पा नको तिसरी लाट🙏

1 min
382

बाप्पा पाहतोय तुझी वाट

करु तुझ्या आगमनाचा थाट,

आयुष्य झालयं भुईसपाट

विघ्नहर्त्या नष्ट कर तिसरी लाट !!

बाप्पा दर्शन व्हावं तुझं थेट

पै पाहुण्यांची व्हावी गळाभेट ,

सुखी संसाराची लागुन गेलीय वाट

विघ्नहर्त्या नष्ट कर तिसरी लाट !!

बाप्पा तुझ्या आसनाला देतो पाट

तुझ्या माझ्या मैत्रीची बसुदे गाठं,

नको फिरवुस अमुच्याकडे पाठ

विघ्नहर्त्या नष्ट कर तिसरी लाट !!

बाप्पा नको तो गळ्यात शिक्षेचा फास

घशाखालीच उतरत नाही सुखाचा घास,

विनंती तुजला मोकळी कर अवघड वाट

विघ्नहर्त्या नष्ट कर तिसरी लाट !!


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్