STORYMIRROR

Mahesh V Brahmankar

Children Stories Children

3  

Mahesh V Brahmankar

Children Stories Children

बापमाणूस

बापमाणूस

1 min
267

अनंत उपकारी बापजगाचा!

कर्तव्यदक्ष तो सदैव असे!!

घरात झटतो प्रत्येकी!

स्वतःला मात्र करतो उणे!!


उगीच हसणे!

दुःख लपवणे!!

पोरांसाठी!

सदैव झिजणे!!


कर्तृत्वाची मशाल बाप हा!

स्वछंदी तो शुन्य असे!!

बापाची ही कृत्य किमया!

चिरंजीवी घडविते नित्य सदा!!


विशालमय हा बापजगाचा!

पाशानालाही लाजवितो!!

उदरीं उपाशी राहुनी!

मुलांना मात्र सदैव हसवितो!!


धन्य तुमची किमया!

ऋण तुमचे कसे फेडू बापमाणसा!!

चिरकालचा आशिर्वाद तुमचा!

जणू यशाचा डोंगर उभा!!

स्वीकार करा, नमस्कार आमचा!!2!!


Rate this content
Log in