STORYMIRROR

VINAYAK PATIL

Others

3  

VINAYAK PATIL

Others

बाप

बाप

1 min
221

बाप माझा अहोरात्र राबला 

पण नाही कधी थकला 

स्वता:चा विचार कधी नाही केला 

पण इतरांसाठी खूप झटला 


बाप माझा सर्व काही सहला 

पण कधी नाही बोलला 

घासातला घास राखला 

पण स्वत: मात्र भुकेला राहिला 


बाप माझा खूप कष्ट करी 

कष्ट करता मुलांची काळजी उरी 

पाहिले स्वप्न मुलांच्या साक्षरतेचे 

स्वत: राहिला निरक्षर घरी 


बाप माझा अश्रु गोठत राहिला 

पण वेळेला तोच सोबतीला आला 

कन्यादानाची वेळ आली जवळ 

तसा गोठलेला अश्रुंचा बांध फुटला 


बाप माझा सर्व कार्यातून मुक्त झाला 

पण कधी तक्रारी नाही केल्या

सोसला सर्वांचे अत्याचार

अन् एक दिवस निवांत झोपी गेला 


बाप माझा कायमचा निघून गेला 

सोसला‌ सगळा त्रास व्यक्त न‌ होता 

जो खेळणे झाला मुलांचा

निपचित पडला कुणालाही त्रास न देता 


Rate this content
Log in