बाप
बाप
रात्री सपनात माझ्या मले महा बाप दिसला
दरवाजा उघडत अंधारातच, धडपडनारा हात दिसला,
डोक्यावर मह्या हात ठेऊन म्हणे,
काऊन पोरा फिरतो, रातलोक काऊन जागतो,
काऊंन पैश्यायच्या मागे फिरतं
बाप म्हणे,
लेका तुले माहित नाही
दुनिया कशी मतलबी हाय,
कच्चा खाऊन टाकतीन तुले
ह्यांचा काही भरोसा नाय,
बाप तुझा होता म्हणुन
सगळं गेलं तरुन,
हिम्मत नव्हती कोणाची
तूझ्या बापापुढे उभं राहून बोलुन,
पोरा तु लय साधा हाय
भोळा हाय खुप,
जगू देणार नाही तुले हे
गोळ गोळ बोलणारे खुप,
पोरा आताच थोडा सावध हो जरा,
दुनियादारी बंद कर ही हुशार हो जरा,
आमचं आता झालं गेलं पार पडलं,
ह्यापुढे तुलेच सांभाळावं लागणार हाय घरातलं सगळं,
आपल्या घरातला आता तूच हाय करता,
तुलाच सगळ्यांना द्यावं लागणार हाय न काही मागता,
