STORYMIRROR

गीता केदारे

Others

3  

गीता केदारे

Others

बाप नावाचं काळीज...

बाप नावाचं काळीज...

1 min
241

स्वतःचा जीव ताळूनमाळून 

लेकरांच्या चेहर्‍यावर हसू फुलवायला 

"बाप" नावाचं काळीज लागतं!!! 


स्वतः भोकाचं बनियान परिधान करून 

लेकरांना राजबिंड्यासारखं ठेवायला 

"बाप" नावाचं काळीज लागतं!!! 


स्वतः नाही शिकला सवरला 

पण लेकरांना बॅरिस्टर बनवायला 

"बाप" नावाचं काळीज लागतं!!! 


बेटा.. बेटा... लेकीला बोलून ज्याचं तोंड सुकून जातं 

त्या लेकीला लेकासारखं वाढवायला 

"बाप" नावाचं काळीज लागतं!!! 


लेकीचा हात दुसर्‍याच्या हातात देऊन 

सर्वांच्या नकळत धाय मोकलून रडायला 

"बाप" नावाचं काळीज लागतं!!! 


व्हय... माझा बा पण असाच हाय 

सार्‍या घराचं नंदनवन करायला 

माझ्या "बापा" सारखंच काळीज लागतं!!! 


Rate this content
Log in