बाप माझा थोर
बाप माझा थोर
1 min
189
बाप माझा थोर माणूस
कसा मांडू मी शब्दात
शब्दच अपुरे पडती
तुजविन कोण या जगात
लडखडत्या पायांना शिकविले
करंगळी धरून चालायला
चालता चालता शिकविले मज
भार स्वतःचा सांभाळायला
दाखविली दुनिया मजला
आपल्या खांद्यावर बसवून
परमेश्वराचे दर्शन घेता मज
दिसले माझे दैवत जवळून
कष्टाचे महत्त्व सांगितले
प्रामाणिकपणे समजावून
जपविला विचार सत्याचा
आयुष्याशी सांगड घालून
अश्रु लपविले आयुष्यभर
त्या रागाच्या पडद्यामागे
दिली लाख मोलाची साथ
सर्वांनी पाठ फिरवली मागे
