बालवाडी
बालवाडी
1 min
537
लहानपणीचे ते दिवस आठवले
बालवाडीने माझे जीवन घडविले
बालवाडी होती आमच्या वाडीत
संस्काराची माया होती त्या छडीत
कच्च्या वयात त्या पाठीने रडविले
बालवाडीत जाताना रडलो खूप
डब्यात दिलं होतं आईने भाकर तूप
अ आ ई ने मला सतत किती अडविले
सगळ्यांना तिथं मिळतं होता खाऊ
सतत मला आठवण येतं होता भाऊ
मामाच्या गावाच्या स्वप्नांत मला जडविले
संगमचं आज कुठे गेलं ते बालपण
मोठा झालो आई मला आलं शहाणपण
बालपणीच्या आठवणींत वयाने सडविले
