बालपणीच्या आठवणी
बालपणीच्या आठवणी
बालपणीचे दिवस किती होते छान
सकाळ झाली सूर्य उगवत असे पूर्वेला
शाळेच्या सुरवातीला नवीन वर्षात
मित्रांसोबत गप्पा मारत जाण्यात शाळेला
शाळेतून घरी येईपर्यंत वाट बघत राहायचं
आमचा बाबू अजून आला नाही
सगळ्यांची वाट बघत राहायचे सर्व
प्रत्येक क्षण वेळोवेळी सोबत आम्ही
बालपण म्हटलं आजूबाजूला पाहिलं
बहरलेला निसर्ग असा रमणीय परिसर
बालपण खेळीमेळीच्या वातावरणात
मन मोहून टाकणारा क्षण सारखा एकतर
संध्याकाळ झाली सूर्य अंधाराच्या दिशेने येण्याच्या आधीच
आम्ही खेळ खेळायचो सगळे जण आनंदाने सहभागी व्हायचे
गमतीजमती करत खेळत असायचो
वाडीमध्ये सणसमारंभप्रसंगी
एकमेकांत मिसळून असणारा
क्षण हवाहवासा वाटणारा
दुपारनंतर आम्ही गावातून जाणारी नदी नदीकाठी
पोहण्याचा आनंद असावा परत येणारा
रात्रीच्या वेळी उद्याच्या दिवसाची घाई असते
शाळेत शिकवलेल्या अभ्यासाची पूर्वतयारी
अभ्यासाला सुरुवात जोरात व्हायची
तो वेगळाच अनुभव मनाला आनंद देणारा
