बाळपणीचा काळ सुखाचा
बाळपणीचा काळ सुखाचा
1 min
356
बाळपणीचा काळ सुखाचा
सुट्टीची ती झिंगच न्यारी
आपापली बांधून शिदोरी
पोरी जाती नदीवरी
हुतुतू लगोरी गोट्या
आणि खेळती हमामा
उतरुनी पाण्यामध्ये
करती सारे हंगामा
एकमेकांवरी उडवीत पाणी
खेळती हे बाळ सखे
नसेच त्यांना उद्याची चिंता
पळती त्याजपासून दूर दुःखे
