Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Anil Chandak

Others

5.0  

Anil Chandak

Others

बालपणाचे दिवस

बालपणाचे दिवस

1 min
354


वैशाखाचे तळपते ऊन,

घोर हा,कडका  उन्हाचा!

घामाने,चिंब झाले अंग,

ताप,ऊन  काहिलीचा !!


बालपणांचे,दिवस सुखाचे,

त्यात, सुट्टी उन्हाळ्याची!

नाही शाळा,भिती शिक्षकांची,

सक्ती नाही,अभ्यासांची !!


मित्र,सोबतीसवे,मुक्तछंदे ,

बागडावे,बांधावरच्या पाण्यांत!

एकमेकांवरी,पाण्याचे तुषार,

उडवावे,हसत खेळत !!


थंड , पाण्याचे  फवारे,

करी मनांसी  उल्हसीत !

चाले, टिंगल  जिंगल,

खेळ,  चाले  उत्साहात !!


बालपणीचे ते खेळ,

धरी फेर,माझ्या मनांत!

सोनियाचे, दिस  आगळे,

कधी मनी,चिंता काळजी ना स्पर्शीत!!


कधी,   डोहात  जाऊनी,

मारावे, खोलवरी   सूर !

होते,  निर्भयी, ते  मन,

देई,  भविष्यांसी  आकार !!


Rate this content
Log in