बालपण
बालपण
1 min
186
रात्री आज्जीच्या गोष्टी, अंगाईत रंगायचा प्रत्येक क्षण
निवांत झोप मऊ कुशीत, आठवतेय माझे बालपण !!
निरागस होती बालमने,घट्ट नात्यांची ती शिकवण
आनंद निखळ मैत्रीचा, आठवतेय माझे बालपण !!
न चढाओढ स्पर्धा, न कुठलीही घसरण
चंचल मनाची गंमत, आठवतेय माझे बालपण !!
न अपेक्षांची भिती, न कुठलेही दडपण
मुक्त स्वनांचा वावर, आठवतेय माझे बालपण !!