बालपण
बालपण
1 min
321
युलुयुलु बोल बोबडे कानी पडे
अंगणवाडी साक्षात उभे ठाके
स्वच्छंद बागडता निर्भय असे
आनंदी आनंद सगळीकडे वसे
बाबळी पुष्प पिवळे कानात डुले
बाबळी शेंगा निनाद पायी शोभे
पर्ण देठ कंठहार पोटावर पडे
वेलीचा मुकुट भाळावर शोभे
शृंगार देखणा वनदेवी शोभे
बालपण मिळो पुन्हा हेच खरे
