STORYMIRROR

UMA PATIL

Others

3  

UMA PATIL

Others

बाळा

बाळा

1 min
489

शूर - वीर पुत्र तू

जसा कौसल्येचा राम

त्रिभुवनात दुमदुमावे

बाळा, तुझेच नाम..... १


जो बाळा जो जो रे जो...


कृष्णाने वाचवून गायी

पर्वत गोवर्धन उचलला

त्याच्या एकेक पुण्याईने

अवघा भारत जिंकला..... २


जो बाळा जो जो रे जो...


या भारतमातेसाठी

प्राण वीरांनी वेचियले

स्व - बलिदान देऊन

विजयाचे रणशिंग फुंकिले..... ३


जो बाळा जो जो रे जो...


शिवबा बनून तू

निर्माण कर ठसा

सारे लोक घेतील

बाळा, तुझाच वसा..... ४


जो बाळा जो जो रे जो...


गुणी माझा बाळ 

आहे घराण्याची शान

कीर्ती लाभावी तुला

लाभावा मान, सन्मान..... ५


जो बाळा जो जो रे जो...


Rate this content
Log in