STORYMIRROR

R U Salunke

Others

3  

R U Salunke

Others

बाभूळ..

बाभूळ..

1 min
264

ती एक उभी बाभूळ होती

तिला काटेरी शाल होती

मी उभा तिच्या खाली 

माझी ढाल होती... 1


माणसाला देण्यासाठी 

तिच्याकडे सावली होती 

उघड्या माणसाची 

ती छत्रदायी माऊली होती.. 2


त्या उंच टेकाडावर 

उभी ती घट्ट पाय रोवून 

येतात वावटळ तरी 

नाही जात धरणी माय सोडून.. 3


शिकावे काही तरी 

आम्ही ही तिच्याकडून 

सोसत दुःख सारे 

नाही अपेक्षा कोणाकडून... 4


Rate this content
Log in