अवगुणांची शिदोरी
अवगुणांची शिदोरी
जगी परिपूर्ण सगुण नाहीच कुणी
मला माझे अवगुणच दिसे जास्त
नाकावर रागोबा बसलेलाच असतो
कुणी जरा बोलले की उसळतो मस्त.
स्पष्ट तोंडावर मी बोलते बरे वा वाईट
सगळ्यांनाच ते आवडत नाही बाई
मग मनाला वाटते फार वाईट
का बरे केली मी बोलण्यात घाई!
जेवायला कुणाला बोलावले घरी
खा खा करून करते मी आग्रह फार
सगळ्यांनाच आवडत नाही हे सारे
कळून मन दुखावले जाते माझे पार.
उशिरापर्यंत जागणे, वेळेवर न खाणे
लगेच अति भावूक होऊन दुःखी होणे
अति घराची साफसफाई करणे आणि
माझ्या तब्येतीची काळजी न घेणे.
या सगळ्या दोषांमुळे सर्वाना होतो त्रास
पण आज या कवितेत मी शपथ घेते मात्र
हे सगळे माझे अवगुण हळुहळू कमी करीन
आणि लोकांच्या आवडीला होईन पात्र.
