STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

4  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

अवेळी पाऊस

अवेळी पाऊस

1 min
367

पाऊस नेहमीच सर्वाना

काळजी लावून जातो

सुरुवातीला पडत नाही

परतीला जातांना रडवतो


आभाळाकडे डोळे लावले

तरी कुठं लपून बसतो

हातात धान येण्याचा वेळा

नासाविण्या खूप बरसतो


प्रत्येकवेळी हा शेतकऱ्यांच्या 

जिवाशी असा का खेळतो

नियम तोडणारे आहेत खुपजण

त्यांच्याच जिवाला का जाळतो


शेवट गोड व्हावा असे 

आम्हा सर्वांना वाटते

देऊ नको जुलमी त्रास

पाहून डोळ्यात अश्रू दाटते


Rate this content
Log in