STORYMIRROR

Sanjana Kamat

Others

3  

Sanjana Kamat

Others

अट्टाहास

अट्टाहास

1 min
11.5K

अट्टाहास बालपणाचा,

आभाळ मायेच्या छायेचा.

दिलखुलास जीवनाचा.

गेला काळ तो सोन्याचा.


अट्टाहास आई-बाबांचा,

दुसऱ्यास सावली देण्याचा.

भावंड व प्रपंचासाठी झिजण्याचा,

चंदनापरी परिमळत कर्तव्याचा.


अट्टाहास गावच घर राखण्याचा,

तिथेच गणपती पुजण्याचा.

विसरू नये कुलदेवत व मातीला,

एकत्र कुटुंब होत नांदणाऱ्या वस्तीचा.


अट्टाहास प्रत्येक कलागुणांना,

प्रगत करत व्यवसाय निर्मितीचा.

स्वप्नपूर्तीस गरूड भरारी झेप घेत.

प्रत्येकांस हक्क,स्वावलंबी जगण्याचा.


अट्टाहास परमार्थ साधण्याचा,

जगातील चारधाम भेटीचा.

कर्तव्यपुर्ती करत, ऋणमुक्तीचा,

आत्मसमाधान तो मोक्षप्राप्तीचा.


Rate this content
Log in